कोण्या एका घनदाट जंगलात
मस्त डोलणाऱ्या झाडाच्या
कुशीत राहून वाढलेली
होती ती भिंतीतली खुंटी
कधी पिशवी कधी सतरंजी
कधी पावसात भिजलेली छत्री
न प्रश्न न कुतूहल कधी
धरलं खांद्यावर जे आलं नशिबी
तुझ्यावर डागल्या किती मी तोफा
तुझी कधी ना तक्रार ना कधी अपेक्षा
सोडला तुझ्यावर भार माझा सारा
का नाही सुटला तुझा कधी पारा
असती जवळ एखादी परी
पाहिली असती कधीच तिची भरारी
पण होती आयुष्यात रोवलेली
माझ्याकडे अढळ साथ तुझी